Friday, May 26, 2017

Door Step School - Annual Presentation 2017

The Annual Presentation of Door Step School, Pune was organized on 13th of May 2017 at the auditorium in Nivara Old age Home, Navi Peth. Employees, volunteers, donors, and well-wishers of the organization attended the event in large numbers.

Celebrating yet another year of hard work and perseverance; Door Step School staff came together to review the activities conducted throughout last year, for the children from marginalized communities in the city. The day started with the diya lighting ceremony by our very own Founder and President, Mrs. Rajani Paranjpe. This was followed by a song that was beautifully sung by few members of the DSS team.

The main agenda of the event was to provide a report on programs and activities conducted during the year gone by. Team members gave a detailed analysis of all the good work their respective teams had put in throughout the year. Around 74,000 children were covered during year 2016-17, under projects like Educational Activity Centers and mobile classrooms for children from migrant communities, reading skill development program for children studying in government schools, citizens' campaign for bringing out-of-school children into mainstream education, arrangement of transport facility for regular attendance in schools, parent awareness program as well as a program teaching good sanitation habits to children at young age. Related statistics, monitored progress and future plan of action were shared with the audience.

Also on display, was some creative and well crafted work by the staff members of Door Step School, which surely left the guests gasping in awe. The students also enacted a small skit on child sexual abuse, which highlighted an existing issue in our society. On the occasion of Annual Presentation, Door Step School published a book 'Sarvansathi Shikshan' (Education for All), penned by Founder-President Rajani Paranjpe, based on experiences in conducting educational activities for children from urban poor communities. The book contains information and analysis of challenges faced while educating such children in Pune and Mumbai during first 10 years from starting the organization in 1988.

The Annual Day was concluded with felicitation of deserving volunteers and a small speech by Rajani Tai. The appreciation and encouragement from the guests have boosted the confidence of Door Step School team, for sure.

(Reported by: Angad Sidhu, Volunteer; Edited by: Sonal Kulkarni, Door Step School)
'डोअर स्टेप स्कूल' संस्थेचे वार्षिक सादरीकरण १३ मे २०१७ रोजी निवारा वृद्धाश्रम, नवी पेठ येथील सभागृहात आयोजित करण्यात आले. संस्थेचे कार्यकर्ते, स्वयंसेवक, देणगीदार, आणि हितचिंतक मोठ्या संख्येने कार्यक्रमास उपस्थित होते.

या निमित्ताने, पुणे शहरातील शिक्षणापासून वंचित राहिलेल्या बालकांसाठी गेल्या वर्षभरात राबविलेल्या विविध उपक्रमांचा आढावा 'डोअर स्टेप स्कूल'च्या कार्यकर्त्यांनी घेतला. संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा सौ. रजनी परांजपे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमास सुरुवात झाली. यानंतर संस्थेच्या काही कार्यकर्त्यांनी सुरेल गीत सादर करुन उपस्थितांचे स्वागत केले.

गतवर्षातील प्रकल्प व उपक्रमांचा अहवाल सादर करणे हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता. गेल्या वर्षभरात आपापल्या प्रकल्प गटांनी केलेल्या कामाचे तपशीलवार सादरीकरण संस्थेच्या कार्यकर्त्यांनी केले. स्थलांतरित मुलांसाठी वस्तीपातळीवरील वर्ग व चाकांवरची फिरती शाळा, सरकारी शाळांमधील मुलांसाठी वाचन संस्कार प्रकल्प, शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागरिक अभियान, शाळेतील नियमित उपस्थितीसाठी वाहतुक सुविधा, तसेच पालकांचे सक्षमीकरण, लहान वयातच मुलांना स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी उपक्रम, या सर्वांमधून २०१६-१७ वर्षात सुमारे ७४,००० मुलांपर्यंत संस्थेचे काम पोहोचले. या संदर्भातील आकडेवारी, नियंत्रित प्रगती, व भविष्यातील योजना उपस्थितांसमोर सादर करण्यात आल्या.

याबरोबरच, 'डोअर स्टेप स्कूल'च्या कार्यकर्त्यांनी तयार केलेली प्रकल्पविषयक साधने व माहिती कार्यक्रमस्थळी प्रदर्शित करण्यात आली होती. विद्यार्थ्यांच्या एका गटाने 'बाल लैंगिक शोषण' या समाजातील ज्वलंत विषयावरील पथनाट्यही सादर केले. वार्षिक सादरीकरणाच्या निमित्ताने, 'डोअर स्टेप स्कूल'तर्फे 'सर्वांसाठी शिक्षण' या रजनी परांजपे लिखित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. १९८८ साली संस्थेचे कार्य सुरु केल्यापासून पहिल्या दहा वर्षांमधे पुणे व मुंबई शहरातील वंचित मुलांपर्यंत शिक्षण पोहोचविताना आलेल्या अडचणींबाबत माहिती व विश्लेषण या पुस्तकात देण्यात आले आहे.

संस्थेच्या उपक्रमांमधे स्वेच्छेने योगदान देणार्‍या स्वयंसेवकांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला. रजनीताईंच्या छोटेखानी भाषणाने समारंभाची सांगता झाली. उपस्थितांनी केलेल्या कौतुकामुळे व त्यांच्याकडून मिळणार्‍या प्रोत्साहनामुळे 'डोअर स्टेप स्कूल'च्या कार्यकर्त्यांचा उत्साह नक्कीच वाढला आहे.

1 comment:

  1. It was an inspiring event. Hats off to Rajanitai and the entire team of DSS. Every visitor could feel their efforts .

    ReplyDelete