Wednesday, November 25, 2015

'लोकमत सखी सन्मान पुरस्कार' रजनी परांजपे यांना जाहीर

(Click on image to read)
विविध क्षेत्रांत आपल्या कष्टाने आणि कर्तृत्वाने उज्ज्वल यश संपादित केलेल्या महिलांना यंदाच्या वर्षी 'लोकमत सखी सन्मान पुरस्कार २०१४-१५'ने सन्मानित करण्यात येणार आहे. 'लोकमत' माध्यम समूहाच्या वतीने आयोजित 'लोकमत वूमन समिट' हा महिलांचा गौरव करणारा व महिलांच्या सक्षमीकरणाच्या अनुषंगाने विविध बाबींवर प्रकाशझोत टाकणारा आगळावेगळा कार्यक्रम आहे. यंदाच्या वर्षी शिक्षण क्षेत्रासाठी 'डोअर स्टेप स्कूल' संस्थेच्या संस्थापिका रजनी परांजपे यांना 'लोकमत सखी सन्मान २०१५' या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. बांधकाम साईट्सवर, झोपडपट्ट्यांत, रस्त्यांवर फिरणार्‍या अशा विविध प्रकारे शाळाबाह्य असणार्‍या मुलांसाठी 'डोअर स्टेप स्कूल' या संकल्पनेतून शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. पूर्व प्राथमिक शिक्षण, शाळेत जाणार्‍या विद्यार्थ्यांना मदत व इतर प्रकारचे साक्षरता वर्ग राबविण्याचे काम त्या करतात.

No comments:

Post a Comment