Tuesday, July 16, 2013

शालाबाह्य मुले शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात


भटक्या लोकवस्तीतील, बांधकाम प्रकल्पावरील मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्‍न करून, त्यांचे यशस्वी शैक्षणिक पुनर्वसन करण्याचे कार्य बालेवाडी येथील (कै.) बाबूराव गेणूजी बालवडकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सुनंदा पाटील व त्यांच्या सहकारी शिक्षकांनी यशस्वी केला आहे. या उपक्रमामुळे शाळेच्या पटसंख्येतही वाढ झाली आहे.

बाणेर, बालेवाडी परिसरातील काही भागांमध्ये बांधकाम क्षेत्रात काम करणारे परराज्यांतील मजूर वास्तव्यास आहेत. ही मंडळी मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष करता. बालवडकर विद्यालयातील शिक्षक प्रत्यक्ष बांधकामाच्या ठिकाणी जाऊन, मुलांना शाळेत पाठविण्याची विनंती करता. याकामी 'डोअर स्टेप' ही स्वयंसेवी संस्था मदत करत असल्याचे पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत दीडशे मुलांना प्रवेश दिला आहे.

(दै. सकाळ - १६ जुलै २०१३)

No comments:

Post a Comment