Monday, January 16, 2017

Sanitation Facilities in Schools under CSR Initiative

Door Step School, an NGO working for education of underprivileged children in Pune, has taken up this challenge along with 3DPLM Software Solutions Ltd., an IT company located in Hinjawadi-Pune, to create awareness about importance of sanitation and cleanliness among school-going children under the project 'Teach Them Young'. Personal hygiene and sanitation habits are being taught to children in primary schools across Pune city. One of the objectives of this project is to ensure basic infrastructural facilities in the schools. These include sufficient water supply, separate and clean toilets for boys and girls, monitored mid-day meal activity in government and private schools, etc.

3DPLM Software Solutions Limited is 2nd largest R&D lab of 3DS & an integral part of DS ecosystem. 3DPLM’s CSR – ‘the 3D-way of giving back’ is committed to create a positive, sustainable transformation in the community through passionate and dedicated efforts of the organization and its employees. As an organization, 3DPLM has always been a socially aware entity, and has been consciously contributing towards the welfare of the underprivileged sections of the society through various events & initiatives.

The company has come forward to help Gopal Krishna Primary School, a Government-aided private school in Gokhalenagar area of Pune. This school provides education to children from economically weaker section, at nominal tuition fees. Around 175 children are enrolled in this school studying from first to fourth standards. The basic sanitation facilities such as toilets, water storage tank, wash basin, etc. have been provided at the school, under Corporate Social Responsibility (CSR) initiative of 3DPLM Software Solutions Ltd. An inauguration event of these facilities was held in the school on 10th January, 2017.  Mr. Rajiv Naithani, Director HR from 3DPLM Software Solutions Ltd. was the Chief Guest during the programme. There were many volunteers from this company who joined this program, along with Door Step School representatives, and teachers from Gopal Krishna Primary School.

Apart from this private school, 3DPLM has also supported construction and renovation of sanitation facilities like separate toilets/Washrooms for girls and boys studying at a Zilla Parishad Primary School in Kondhwe-Dhawade village. A separate storage tank has been provided to store drinking water. Also, water filters have been installed in the school under CSR initiative of the company. Around 350 students from first to seventh standard will be benefitted by the improved facilities in this school.

With a vision of giving back to the society and helping inclusive growth of deprived community, 3DPLM has been supporting education and child welfare activities in Pune. With such positive support, Door Step School is planning to extend the sanitation project to more Government and private schools in the city.

3DPLM Software Solutions - www.3dplmsoftware.com
Door Step School - www.doorstepschool.org

पुण्यातील वंचित मुलांच्या शिक्षणासाठी काम करणा-या ‘डोअर स्टेप स्कूल’ या स्वयंसेवी संस्थेने हिंजवडी येथील ‘थ्रीडीपीएलएम सॉफ्टवेअर सोल्युशन्स लि.’ या माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपनीच्या मदतीने शालेय विद्यार्थ्यांना योग्य वयातच स्वच्छतेच्या सवयी लावण्यासाठी व शाळांमधून स्वच्छतेच्या सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी ‘लहानपणीच गिरवू धडे’ हा उपक्रम सुरु केला आहे. पुणे शहरातील काही सरकारी व खाजगी प्राथमिक शाळांमधील मुलांना स्वच्छतेचे धडे दिले जात आहेत. याअंतर्गत शाळांमधे स्वच्छतेच्या सुविधा, उदाहरणार्थ पुरेसा पाणीपुरवठा, मुला-मुलींसाठी स्वतंत्र व वापरण्यायोग्य स्वच्छतागृहे यांची उपलब्धता करुन घेतली जात आहे, तसेच नियंत्रित मध्यान्ह भोजन उपक्रमही राबविण्यात येत आहे.

थ्रीडीपीएलएम सॉफ्टवेअर सोल्युशन्स लिमिटेड ही थ्रीडीएसची दुसरी सर्वात मोठी आर ॲन्ड डी लॅब असून, ती डीएस इकोसिस्टीमचा एक भाग आहे. कंपनीच्या व कर्मचा-यांच्या समर्पित प्रयत्नांमधून समाजात एक सकारात्मक व शाश्वत बदल घडवण्याच्या उद्देशाने थ्रीडीपीएलएमचा ‘सीएसआर’ उपक्रम – ‘दी थ्रीडी वे ऑफ गिव्हींग बॅक’ – राबविला जात आहे. सामाजिक प्रश्नांबाबत थ्रीडीपीएलएम ही कंपनी नेहमीच संवेदनशील राहिली असून, विविध उपक्रमांद्वारे समाजातील वंचित घटकांच्या कल्याणासाठी योगदान देत आली आहे.

पुण्याच्या गोखलेनगर भागातील गोपाळ कृष्ण प्राथमिक शाळा या शासन-अनुदानित खाजगी शाळेच्या मदतीसाठी कंपनीने पुढाकार घेतला आहे. ही शाळा परिसरातील आर्थिक दुर्बळ कुटुंबांमधील मुलांना नाममात्र शुल्क आकारुन शिक्षण उपलब्ध करुन देत आहे. सदर शाळेत पहिली ते चौथीच्या वर्गांमधे साधारण १७५ मुले शिकतात. या शाळेमधे मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे, पाण्याची टाकी, वॉश बेसिन आदी स्वच्छतेच्या सुविधा थ्रीडीपीएलएम सॉफ्टवेअर सोल्युशन्स लि. यांच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी (सीएसआर) उपक्रमांतर्गत पुरविण्यात आल्या आहेत. दि. १० जानेवारी २०१७ रोजी या सुविधांचे उद्घाटन थ्रीडीपीएलएम सॉफ्टवेअरचे संचालक (एचआर) श्री. राजीव नैथानी यांच्या हस्ते करण्यात आले. कंपनीचे इतर अधिकारी व स्वयंसेवक, तसेच ‘डोअर स्टेप स्कूल’ संस्थेचे कार्यकर्ते, शाळेचे पदाधिकारी व शिक्षक यावेळी उपस्थित होते.

या खाजगी अनुदानित शाळेसोबतच, थ्रीडीपीएलएम कंपनीने कोंढवे-धावडे गावातील एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील स्वच्छतेच्या सुविधांसाठीही निधी उपलब्ध करुन दिला आहे. ‘सीएसआर’अंतर्गत या शाळेत, मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टाकी, तसेच जलशुद्धीकरण यंत्र (वॉटर फिल्टर) चे काम हाती घेण्यात आले आहे. सदर शाळेत पहिली ते सातवीच्या वर्गांमधे शिकणा-या सुमारे ३५० विद्यार्थ्यांना या सुधारित सुविधांचा लाभ घेता येणार आहे.

समाजाचे देणे फेडण्याच्या व वंचित घटकांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मदत करण्याच्या हेतुने थ्रीडीपीएलएम कंपनीतर्फे पुण्यातील शिक्षण व बालकल्याण उपक्रमांना सहाय्य पुरविले जात आहे. अशा सकारात्मक पाठींब्याच्या आधारावर, डोअर स्टेप स्कूल संस्थेने सदर स्वच्छताविषयक उपक्रम शहरातील इतरही सरकारी व खाजगी शाळांमधून राबविण्याचा संकल्प केला आहे.

थ्रीडीपीएलएम सॉफ्टवेअर सोल्युशन्स - www.3dplmsoftware.com
डोअर स्टेप स्कूल - www.doorstepschool.org

Friday, January 13, 2017

शिक्षण उत्सव 2017

शिक्षण मंडळ, पुणे महानगरपालिका आयोजित 'शिक्षण उत्सव 2017'मधे शिक्षणप्रमुख चव्हाण मॅडम, सहाय्यक शिक्षणाधिकारी आवारे मॅडम, मुलाणी मॅडम, उचाळे सर, बोकारे सर यांचेसोबत 'डोअर स्टेप स्कूल'च्या विभाग समन्वयक छाया सणस, संगीता हुलावळे, सुषमा रानावडे, सुनिता ढेणे.

Wednesday, January 11, 2017

Shikshan Utsav 2017

Pune Municipal Corporation's Shikshan Mandal has organized Shikshan Utsav 2017 - an education fair - at Pathare Primary School (PMC School No.181 B), Kharadi, Pune. Door Step School got an opportunity to present teaching tools and reading material at this fair. Teachers, education associates, government officials, and students are visiting the stalls with curiosity and interest. Some of the children even started reading books put on display.

The Shikshan Utsav will be open on 11th and 12th of January 2017, from 8:30am till 6:00pm. Visit us at stall No.21.

Friday, January 6, 2017

From the Streets to the Stage!

You might have seen them at the traffic signals many times, selling something and looking helpless. But you would not recognize them here today. Not just because of change in their attire or the makeup they have put up, but more so because of change in their confidence and happiness, thanks to unexpected opportunity to publicly present their skills.

Door Step School works with a broader objective of 'education for all'. This means we have to understand practical difficulties specific to the children and communities, and find out ways to overcome those. For example, this group of children living under flyovers and selling petty items at traffic signals in the city of Pune. Door Step School is working with these children since last few years and trying to bring them in main stream of formal education. However, the nature of their work and living conditions of their families have always created obstacles in their journey towards education.

Sadhana, Manju, Gauri, and several other children from slums and pavements at Deccan - Pulachi Wadi and Chatushrungi area, Shivajinagar have been enrolled in Pune Municipal Corporation school no.14 and we are trying to retain them there by providing other support services. This year their school, along with other PMC schools in the vicinity, held the annual cultural programme at the very famous Balgandharva Auditorium at Deccan. And our children got an opportunity to participate in performances like dance and drama.

Forget about performing on stage, these children entered the auditorium for the first time in their life. This obviously made them nervous initially. But with the encouragement from their teachers and audience, they performed really well. On behalf of the children, we would like to thank the PMC school for providing them an experience which they will never forget.

(Reported by Sunita Bhalerao, Door Step School)


तुम्ही या मुलांना कित्येकदा बघितलं असेल - सिग्नलवर केविलवाण्या चेह-यानं काहीतरी विकताना. पण आज इथं तुम्ही त्यांना ओळखूच शकणार नाही. फक्त त्यांच्या बदललेल्या कपड्यांमुळं किंवा मेक-अपमुळं नाही, तर आपली कला सादर करायची अनपेक्षित संधी मिळाल्यानं त्यांच्या चेह-यावर फुललेल्या आनंद आणि आत्मविश्वासामुळं.

'सर्वांसाठी शिक्षण' हे ध्येय घेऊन 'डोअर स्टेप स्कूल' बरीच वर्षं काम करत आहे. यासाठी, मुलं आणि त्यांच्या विशिष्ट कुटुंब-वस्तीच्या ख-या समस्या समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात. उदाहरणार्थ, पुणे शहरातल्या उड्डाणपुलांखाली राहणारी आणि ट्रॅफीक सिग्नलला छोट्या-मोठ्या वस्तू विकत फिरणारी ही मुलं. गेल्या काही वर्षांपासून 'डोअर स्टेप स्कूल' या मुलांना शालेय शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. पण या मुलांच्या कामाचं स्वरुप आणि त्यांच्या कुटुंबाचं राहणीमान या गोष्टी त्यांच्या शिक्षणात नेहमीच अडथळे निर्माण करत राहतात.

डेक्कनच्या पुलाची वाडी आणि शिवाजीनगरच्या चतुःश्रृंगी भागात झोपड्या आणि फुटपाथवर राहणा-या साधना, मंजू, गौरी, आणि अशा अनेक मुलांना पुणे महानगरपालिकेच्या शाळा क्र. 14 मधे दाखल करण्यात आलं आहे, आणि शक्य ती सर्व मदत देऊन आम्ही त्यांना तिथं टिकवण्याचा प्रयत्नही करत आहोत. या वर्षी त्यांच्या शाळेनं परिसरातल्या इतर काही म.न.पा. शाळांना सोबत घेऊन त्यांच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचं आयोजन डेक्कनवरच्या प्रसिद्ध बालगंधर्व रंगमंदीरात केलं. आणि आमच्या या मुलांनाही डान्स आणि नाटकामधे भाग घेण्याची संधी मिळाली.

स्टेजवर जाऊन काहीतरी सादर करणं तर दूरच, असं एखादं नाट्यगृह आतून बघण्याचीसुद्धा या मुलांची आयुष्यातली ही पहिलीच वेळ होती. साहजिकच सुरुवातीला मुलं गोंधळलेली दिसत होती. पण शिक्षक आणि प्रेक्षकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळं त्यांनी खूप छान काम केलं. या अविस्मरणीय अनुभवासाठी मुलांच्या वतीनं आम्हीच पुणे म.न.पा.च्या शाळेचे आणि शिक्षकांचे आभार मानतो.

(अहवाल - सुनिता भालेराव, डोअर स्टेप स्कूल यांचेकडून)

Thursday, January 5, 2017

Christmas Celebrations at Door Step School

December is usually a happening month in many ways. Lots of events and activities  are conducted for children in Door Step School centers across the city. Some of the children are taken to a nearby park for picnic, while others are busy in planning Diwali / Christmas parties.

At one of the temporary slums in Hadapsar, our children had fun celebrating Christmas. This location is covered by our mobile classroom, the School-on-Wheels bus and some of the children have been enrolled in nearby government school. Children attended party in the bus wearing colourful clothes. They sang songs taught to them in the school and in the class. Highlight of the party was gift distribution by Santa Claus!

We observed children not regular to our classes had come for the party with their siblings and friends. Parents who were reluctant to send their children for the classes, were curiously watching the children having fun in the bus. Events like this help us attract more children and parents towards the classes and eventually to the school.

(Reported by Firdos Momin, Door Step School)

डिसेंबर महिन्यात 'डोअर स्टेप स्कूल'च्या शहरभर पसरलेल्या वर्गांवरील मुलांसाठी निरनिराळे कार्यक्रम आयोजित केले जातात. काही मुलांना सहलीसाठी जवळच्या बागेमधे नेलं जातं, तर काही वर्गांवर दिवाळी / ख्निसमसनिमित्त पार्टी केली जाते.

हडपसरमधे एका वस्तीवर आमच्या मुलांनी अशाच ख्रिसमस पार्टीचा आनंद लुटला. या वस्तीवर आम्ही 'स्कूल-ऑन-व्हील्स' या आमच्या 'चाकांवरच्या शाळे'त अभ्यास वर्ग चालवतो. काही मुलांना जवळच्या सरकारी शाळेत दाखलही करण्यात आलं आहे. ख्रिसमस पार्टीसाठी मुलं रंगीबेरंगी कपडे घालून आली होती. त्यांनी शाळेत आणि वर्गावर शिकलेली गाणी गायली. पार्टीचं मुख्य आकर्षण होता, मुलांसाठी गिफ्ट घेऊन आलेला सान्ताक्लाॅज!

बसमधे नियमित न येणारी वस्तीवरची इतर मुलंही आपल्या भावंडांसोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत पार्टीला आलेली दिसली. मुलांना शिकण्यासाठी वर्गाला न पाठवणारे पालक बसमधे मुलांना मजा करताना बघत होते. अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून अशी अनेक मुलं आणि पालक आम्हाला आधी वर्गापर्यंत आणि मग शाळेपर्यंत आणायला मदत होते.

(अहवाल - फिरदोस मोमिन, डोअर स्टेप स्कूल यांचेकडून)

Tuesday, January 3, 2017

Book Fair at Dighi School

A Book Fair was organized on 28/12/2016 at two schools in Dighi Gaon (Pimpri-Chinchwad) under Door Step School's Reading Classes Programme. This Book Fair at Chhatrapati Shahu Maharaj Primary School, Dighi Gaon included -

* Book Stall,
* Newspapers, Magazines, and all types of Books in other languages,
* Experiments Stall,
* Creative Activities like Finger Impression Art Work, Making Paper Animals, Collage, Puppet Show,
* Teaching Tools Stall, etc.

The Book Fair was inaugurated by Deputy Administrative Officer of Pimpri-Chinchwad School Board Mr. Parag Munde, Chairman of School Management Committee Mrs. Manda Walake, Principal of Dighi School Mr. Tukaram Langi.

490 children and 14 teachers from this school along with 4 teachers and 10 students from other schools, and 22 Book-Fairies, 60 parents participated in the Book-Fair.

Children were busy reading books at the Book Stall. They also noted down names of various newspapers. Questions were asked during experiments shown to them. Some of them even tried few experiments on their own. Active participation was seen at Creative Activity Stall. Children watched 6 stories through Puppet Show. Parents were also seen visiting the stalls with interest and curiosity.

The School Principal mentioned that this Book Fair provided an opportunity to the children to witness and learn many new things. For the first time, children watched stories through Puppets. They had also never seen so many types of newspapers before.

(Reported by Sushma Ranawade, Area Co-ordinator, Door Step School)

'डोअर स्टेप स्कूल' वाचन संस्कार प्रकल्पाअंतर्गत दि. २८/१२/२०१६ रोजी पिंपरी चिंचवड भागातील दिघी गाव येथील २ शाळांमधे पुस्तक मेळाव्याचे आयोजन केले होते. छत्रपती शाहूमहाराज प्राथमिक विद्यालय, दिघी गाव येथील पुस्तक मेळाव्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे होते -

* पुस्तकांचा स्टॉल,
* इतर भाषांतील वर्तमानपत्रे,मासिके, व सर्व प्रकारची पुस्तके,
* प्रयोगाचे स्टॉल,
* सृजनशील कृतीमध्ये ठसेकाम, उंदीर बनविणे, कुत्रा बनविणे, कोलाज काम, पपेट शो,
* साधन साहित्य स्टॉल, इत्यादी.

या पुस्तक मेळाव्याचे उदघाटन पिंपरी चिंचवड शिक्षण मंडाळाचे उप-प्रशासकीय अधिकारी श्री. पराग मुंडे, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ. मंदा वाळके, दिघी शाळेचे मुख्याध्यापक श्री. तुकाराम लांगी यांच्या हस्ते झाले.

शाळेतील ४९० मुले व १४ शिक्षक, इतर शाळेतील ४ शिक्षक व १० मुले, २२ पुस्तकप-या, ६० पालक, या सर्वांनी पुस्तक मेळाव्यात सहभाग घेतला.

पुस्तकांच्या स्टाॅलवर मुलांनी पुस्तके वाचण्यास घेतली होती. तसेच विविध वर्तमानपत्रांची नावे मुलांनी वहीमधे लिहून घेतली. प्रयोग करताना मुले 'असे कसे होत आहे?' असे प्रश्न विचारत होती. काही प्रयोग स्वतः करुनही पाहत होती. हे स्टाॅल मुलांना खूप आवडले. सृजनशिल कृतीच्या स्टाॅलवर मुलांनी सक्रीय सहभाग घेतला. 'पपेट शो'मध्ये मुलांनी वेगवेगळ्या ६ गोष्टी ऐकल्या व बघितल्या. पालकही यामध्ये उत्साहाने सहभागी झाले होते.

'आमच्या मुलांना या मेळाव्यातून खूप काही शिकायला मिळाले, 'पपेट'च्या माध्यमातून गोष्टी पहिल्यादांच ऐकल्या, वर्तमानपत्रे इतक्या प्रकारची असतात हेही मुलांना आजच समजले,' असे शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले.

(अहवाल - सुषमा रानावडे, विभाग समन्वयक, डोअर स्टेप स्कूल यांचेकडून)